Lonavala News: पवना धरणात बुडून लोणावळ्यातील तरुणाचा दुदैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – म‍ावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून लोणावळ्यातील एका तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. आज रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ब्राह्मणोली गावाजवळ ही घटना घडली. 

सौरभ मलिक (वय 33 रा. लोणावळा. मूळचा राहणार उत्तर प्रदेश) असे या मृत पावलेल्या तरूणाचे नाव आहे. सौरभ हा लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेत योगाचे शिक्षण घेत होता.

सौरभ व त्याचे तीन मित्र काल शनिवारी रात्री पवना धरण परिसरातील टेंट कॅम्पिंगवर फिरण्यासाठी आले होते. रात्री कॅम्पवर मुक्काम केल्यावर आज सकाळी ब्राम्हणोली येथे गाड्या उभ्या करून पवना धरणाच्या पाण्याकडे गेले व पवना धरणात पोहण्यासाठी उतरले.

त्यामध्ये सौरभला पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणाच्या पाण्यात बुडाला. बाकीच्या तीन मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी त्याला पाण्याबाहेर काढला व नंतर पवनानगर येथील ग्रामीण रूग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III