Lonavala News: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन वृक्षारोपणाने साजरा

Lonavala News: Anniversary of Sinhagad Technical Education Society celebrated with tree planting संस्थेच्या परिसरात आतापर्यत सात हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. संस्थेत प्लेसमेंटसाठी येणार्‍या कंपन्यांच्या नावाने वृक्ष लावले आहेत.

एमपीसी न्यूज- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा 28 वा वर्धापनदिन कुसगाव येथील संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. वृक्षारोपणाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सामाजिक व भौतिक संकेत पाळून करण्यात आला.

लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व नगरसेवक निखिल कवीश्वर यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विशाल विकारी, प्रसिद्धी प्रमुख विशाल पाडाळे हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कवीश्वर यांनी सिंहगडने दर्जेदार शैक्षणिक सुविधा मावळ वासीयांना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व कार्पोरेट गार्डनमधील वृक्षरोपणामुळे होणाऱ्या पर्यावरण संवर्धना बद्दल कौतुक केले. यावेळी संकुल संचालक डॉ. एम एस गायकवाड, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व सेवक वर्गांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सिंहगड तांत्रिक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रो. मारुती नवले यांच्या विचारातून संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले यांच्या नियोजनाने आजमितीस पुणे, मुंबई, सोलापूर, पंढरपूर अशा विविध ठिकाणी 12 संकुलांमधून 70 हजार विद्यार्थी या शिक्षण संस्थामधून करियर करण्याचे स्वप्न पूर्ण करीत आहेत.

संस्थेच्या परिसरात आतापर्यत सात हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. संस्थेत प्लेसमेंटसाठी येणार्‍या कंपन्यांच्या नावाने वृक्ष लावले आहेत. तसेच कर्मचार्‍यांच्या वाढदिवसानिमित्त येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे काम संस्था करत असल्याचे संकुल संचालक गायकवाड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.