Lonavala News: जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ द्या- आमदार सुनील शेळके

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत लोणावळ्यातील संजिवनी रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू झाले आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाग्रस्त रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त लाभ द्या अशा सूचना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी संजिवनी मेडिकल फाऊंडेशनला दिल्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत लोणावळ्यातील संजिवनी रुग्णालयात आजपासून कोविड रुग्णालय सुरू झाले आहे. या रुग्णालयाला आमदार शेळके यांनी भेट देत सुविधांची मागणी केली. यावेळी मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे उपस्थित होते.

रुग्णालयात केलेल्या उपाययोजनांची शेळके यांनी डॉ. अमोल अगरवाल यांच्याकडून माहिती घेतली. वैद्यकिय सेवा देण्यासाठी काही मदत लागली तर सांगा पण रुग्णांना चांगली सेवा द्या, जास्तीत जास्त नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ द्या असा सल्ला दिला.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, महाप्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर, शहराध्यक्ष विलास बडेकर, हारपुडे पाटील, सलिम मण्यार, अनिल मालपोटे, गणेश थिटे, अविनाश ढमढेरे, धनंजय काळोखे, अशोक ढाकोळ, दीपक मालपोटे, नामदेव अंभुरे, प्रविण काळे, विकास गायकवाड व सुनील शेळके युवामंचचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.