Lonavala News : भांबर्डे नवरा नवरी आणि करवली सुळके चढाई आता प्रस्तर रोहकांसाठी अधिक सुरक्षित

एमपीसी न्यूज – ताम्हिणी मार्गावर भांबर्डे गावाच्या पाठीमागे एकमेकांपासून ( Lonavala News) वेगळे दिसणारे 3 सुळके म्हणजेच नवरा,नवरी आणि करवली सुळके. पुण्यापासून 90 किमी वर असल्यामुळे बरेच प्रस्तरारोहक काही वर्षांपासून प्रस्तरारोहणासाठी इथे येतात. पण इथे असलेले जुने रिंग बोल्ट गंजल्याने प्रस्तरारोहण धोक्याचे झाले होते.सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह ह्या संस्थेने इथे असलेला प्रस्तरारोहणाचा धोका ओळखून दि 4 ते 6 मार्च रोजी री-बोल्टिंग व ट्रैनिंग प्रोजेक्ट चे आयोजन केले होते. ह्या प्रोजेक्ट चा हेतू नवीन प्रस्तरारोहकांना री-बोल्टिंग चे ट्रैनिंग देणे आणि मार्ग सुरक्षित करणे हा होता.

 

 

ह्या प्रोजेक्ट मध्ये सुरेंद्र शेळकेविवेक मराठेडॉ नरेंद्र पाटीलसुनील पिसाळनुवाझीश पटेलसंजय शेळकेतुषार दिघेकृष्णा मरगळेगीतेश बांगरेमोहन हुलेमहेश कुमार आणि निहार सोले अश्या 12 जणांच्या चमूने सहभाग घेऊन 3 दिवसात हे तीनही सुळके रि-बोल्टिंग करून सुरक्षित केले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ नरेंद्र पाटील ह्यांनी दिली.

 

 

Pune News : पुणे विमानतळावर 24 वर्षीय महिलेचा राडा

 

याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे खजिनदार नुवाझीश पटेल म्हणाले कीया रि-बोल्टिंग प्रकल्पात एकूण 21 बोल्ट्स लावण्यात आले. या कामात मार्ग न बदलण्याची पूर्ण काळजी घेण्यात आलीतसेच रि-बोल्टिंग करत असताना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. उत्तम तांत्रिक अनुभव असणाऱ्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. व्हीटूए स्टील बोल्ट्स गंजत नाहीत तसेच ते किमान हजार कि.ग्रॅ. वजन पेलू शकतात. भारतीय हवामानात किमान 50 वर्षं ते उत्तम काम देऊ शकतात.

 

 

एससीआय सचिव सुनील पिसाळ म्हणालेया कामासाठी आम्ही 4 मार्च रोजी सकाळी 6 ला शिवाजीनगर पुणे इथून आरंभ केला. सकाळी साडे दहा वाजता पायथ्याशी असणाऱ्या भांबर्डे आश्रम शाळा इथे पोचून बेस कॅम्प चा पूर्ण सेटअप लावला गेला. दुपारचे जेवण उरकून साधारण दीड ला सर्व टीम ने सुळक्यांच्या पायथ्याला जाण्यासाठी प्रस्थान केले.

सुरुवातीचा टप्पा दाट झाडी आणि कारवी तुन जातो पण शेवटी खूप घसारा आणि खडी चढाई असल्याने दोर लावून काळजीपूर्वक सुळक्यांच्या पायथ्याला जावे लागते. दुपारी साधारण अडीच ला पोचून एका टीम ने नवरा सुळका ( 150 फूट ) प्रस्तरारोहण करण्यास सुरुवात केली.

 

जुन्या मार्गाचे फार काळजीपूर्वक निरीक्षण करून आणि चर्चा करून रिबोल्टिंग साठी खाना खुणा केल्या जात होत्या.सरते शेवटी नवरा सुळक्याचा माथा गाठून टीम ने वर बोल्ट मारून स्टेशन बनवले आणि मार्ग सुरक्षित केला. दुसऱ्या दिवशी टीम ने मार्गावरील इतर ठिकाणी बोल्टिंग केले. दुपार नंतर दुसऱ्या टीमने नवरी सुळका ( 100 फूट ) प्रस्तरारोहण करण्यास सुरुवात केली. संध्याकाळी ह्या हि सुळक्याचा माथा गाठून बोल्ट मारून मार्ग सुरक्षित केला गेला.

तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी आम्ही 2 टीम करून एका टीम ने नवरी सुळक्याचे उर्वरित बोल्टिंग पूर्ण केले आणि दुसऱ्या टीम ने करवली सुळक्याचे ( 30 फूट ) बोल्टिंग पूर्ण केले. अश्या प्रकारे दिवसात तीनही सुळक्यांचे मार्ग सुरक्षित करण्यात आले.

या कामात आम्हाला भांबर्डे आश्रम शाळेने त्यांचे मैदान आणि पाणी वापरण्याची ( Lonavala News) परवानगी दिल्याने त्यांचीही मदत झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.