Lonavala News : टाकवे खुर्द गावात डिवाइन युनिव्हर्सिटीचे भूमिपूजन; नागरिकांना मिळणार भारतीय संस्कृतीचे शिक्षण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द या गावात विनर्स ग्रुपच्या वतीने 32 एकर जागेवर डिवाइन युनिव्हर्सिटी (वैदिक विद्यापीठ) या संस्थेची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर विनर्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत खामकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पाश्चात्त्य संस्कृतीच्या मागे भरकटलेल्या तरुणाईला भारतीय संस्कृती व परंपरेची ओळख या विद्यापीठातून होणार आहे. भारताचा प्राचिन इतिहास, संस्कृती, मेडिटेशन यासारखे विविध प्रकारचे वैदिक प्रशिक्षण या विद्यापीठातून दिले जाईल, असे खामकर यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या व डोंगरकुशीत वसलेल्या टाकवे खु. या गावात हे भव्य दिव्य विद्यापीठ 2024 सालापर्यत उभे राहिल. या कामाचा शुभारंभ तसेच हेलिपॅडचे भुमीपुजन आज पार पडले. गुरुकुल पद्धतीने याठिकाणी संस्कृतीच्या ज्ञानासह प्राणायाम, योगा, सूर्यनमस्कार, कराटे, संवाद कौशल्य, व्यावसाय प्रशिक्षण दिले जाणार असून 8 ते 80 वयोगटातील सर्वांना यामध्ये प्रवेश मिळेल. यासह अंतरवर्ग व बाह्यवर्ग क्रीडा प्रकार व गार्डन देखील उपलब्ध असतील असे विनर ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. सर्वात महत्त्त्वाचे म्हणजे या संस्थेच्या निर्मिती दरम्यान व नंतर स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

विद्यापीठ भुमीपुजन सोहळ्यासाठी विनर ग्रुपचे अध्यक्ष शशिकांत खामकर यांच्यासह डायरेक्टर नंदकिशोर निंबाळकर, उद्योजक रमेशशेठ तापकीर व मजहर याकूब बोहरी, विक्रम वैद्य, मुकेश शिरुडे, उद्योजक संदिप वाळुंज, टाकवे गावचे सरपंच तुशांत ढमाले उपसरपंच बाबाजी ओव्हाळ, उद्योजक मारुती आण्णा पंदरी, विशाल वैद्य व टाकवे खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.