Lonavala News : लोणावळ्यातील भुशी धरण ‘ओव्हरफ्लो’

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण आज, शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरील दोन मोर्‍यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली.

कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून पर्यटनस्थळे बंद असल्याने भुशी धरण पर्यटकांना मुकले आहे. यावर्षी देखील अद्याप पर्यटनबंदी कायम असल्याने धरणावर जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आजूनही संचार व जमावबंदीचे आदेश तसेच पर्यटनस्थळे बंदचे आदेश लोणावळ्यात लागू आहे.

पर्यटक लोणावळ्यात येऊ शकतात, हाॅटेल बंगले व फार्महाऊस येथे नियमांचे पालन करून राहू शकतात. मात्र, त्यांना कोणत्याही पर्यटनस्थळांवर जाता येणार नाही. सर्व पर्यटनस्थळे बंद असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.