Lonavala News: अंडा पॉईंट येथे कंटेनरचा अपघात, क्लिनरचा मृत्यू

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कंटेनर उलटला.

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटातील अंडा पॉईंट जवळ आज (दि.2) पहाटे साडेपाच वाजता कंटेनर उलटून झालेल्या अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला. सुरज बगेल (वय 27, रा. मडायन, जि. भेंड) असे मृत क्लिनरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा (एचआर 47 सी 3630)  ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कंटेनर उलटला. यामध्ये कंटेनरच्या खाली अडकल्याने सुरजचा मृत्यू झाला.

त्याच्या मृत्युस जबाबदार झाल्याप्रकरणी राजू कुवरसिंग बगेल (वय 32, रा. रुबाली, जि. भेंड) याच्यावर खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.