Lonavala News : लोणावळ्यात मंगळवारी कोरोना महासर्वेक्षण अभियान; शहर राहणार बंद

स्वंयसेवी संस्था, सर्व राजकीय पक्ष, शिक्षक यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरांचा प्राथमिक आरोग्य तपासणी सर्वे करण्यात येणार आहे.

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.15) लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने कोरोना महासर्वेक्षण अभियान टप्पा क्र. 1 राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी रवी पवार व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या महासर्वेक्षण अभियानांतर्गत मंगळवारी लोणावळा शहर बंद ठेवण्यात येणार आहे. स्वंयसेवी संस्था, सर्व राजकीय पक्ष, शिक्षक यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरांचा प्राथमिक आरोग्य तपासणी सर्वे करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

याकरिता आतापर्यत 576 स्वंयसेवकांची नोंदणी झाली आहे. प्रत्येकी 25 कुटुंबांच्या मागे 1 सेक्टर अधिकारी असेल. त्यांना काही प्रश्नावली देण्यात येणार आहे. त्यानुसार माहिती संकलन व घरातील प्रत्येकांची टेम्प्रेंचर व प्लस आँक्सिमिटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच मंगळवारी किमान 2 हजार जणांची अँन्टिजन टेस्ट करण्यात येणार आहे. याकरिता झालावाडी व वागाड सेनेटोरियम, खंडाळा माध्यमिक शाळा, भुशी रामनगर प्राथमिक शाळा, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्र. 1 व संत ज्ञानेश्वर विद्यालय भांगरवाडी शाळा क्र. 5 याठिकाणी स्वँब कलेक्शन केंद्र तयार करण्यात येणार आहे.

भविष्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या महासर्वेक्षण अभियानाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे त्यादिवशी नागरिकांनी घरातच रहावून तपासणी पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.