Lonavala News : लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी, 144 कलम लागू

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी लागू करण्यात आली असून, कलम 144 अंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

तसेच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी असताना देखील वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील पर्यटनस्थळी येणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

याठिकाणी असेल कलम 144 लागू
भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील व खालील बाबींना प्रतिबंध असेल.

काय आहेत नियम

– पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.

– धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.

– पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.

– सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.

– धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी.

– पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.