Lonavala News: पर्यटनस्थळे बंद असताना देखील लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

लोणावळ्यात सहारा पुल धबधबा, भुशी धरण, लायन्स पाँईट, राजमाची गार्डन या पर्यटनस्थळांचे पर्यटकांना आकर्षण असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व ठिकाणे बंद करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा व मावळ परिसरातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेले असताना देखील आज लोणावळा शहरात व खंडाळा भागातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली होती.

मागील सोमवारपासून मावळ तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागांमधून पाण्याचे धबधबे वाहू लागले आहेत. या धबधब्यांखाली भिजण्याचा तसेच भुशी धरणांच्या पायर्‍यावर बसण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात दाखल झाले होते.

लोणावळ्यात सहारा पुल धबधबा, भुशी धरण, लायन्स पाँईट, राजमाची गार्डन या पर्यटनस्थळांचे पर्यटकांना आकर्षण असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व ठिकाणे बंद करण्यात आली आहे.

खंडाळा, रायवुड व नौसेना बाग याठिकाणी लोणावळा शहर पोलिसांनी चेकपोस्ट लावत ही वाहने व पर्यटक यांना अडवून परत माघारी पाठवले जात असताना देखील आज रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.