Lonavala News : प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून वृक्ष लागवड करावी : विजय तिकोने

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीने मानवाला ऑक्सिजनचे महत्व समजले. वातावरणात ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून वृक्ष लागवड करावी. तसेच वृक्ष संगोपन करावे, असे प्रतिपादन युवा सेना मावळ उपतालुका अधिकारी विजय तिकोने यांनी केले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे औचित्य साधून रेम्बो सर्व्हिसेसच्या पुढाकारातून पाटण ( ता. मावळ) गावात सातशे वृक्षांची लागवड आणि वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सीआरपीएफचे मेजर हिंदुराज साळुंखे, विठ्ठल तिकोने, अक्षय वारिंगे, अविनाश तिकोने, सोमनाथ कोंडभर, विक्रम दाभणे, रोहन तिकोने, अनिकेत तिकोने, शिवम सांभरे, विशाल तिकोने, संकेत तिकोने, आकाश तिकोने आदींसह सीआरपीएफचे जवान उपस्थित होते.

विजय तिकोने म्हणाले, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ अभंगांत वृक्षांचे महत्व अधोरेखित केले आहे. वृक्ष हे परोपकारी असून त्यांचे मानवावर अनंत उपकार आहेत. त्यांचे संगोपन केल्यास कोरोना महामारीत निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा पुन्हा होणार नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

यावेळी वृक्ष रोपे उपलब्ध करून दिल्याबद्दल हिंदुराज साळुंखे यांचा शिवराज्याभिषेक प्रतिमा आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.