Lonavala News: लोणावळ्यात सार्वजनिक ठिकाणी हवेत गोळीबार

Lonavala News: firing in public places in Lonavala मुळशी तालुक्यातील चार तरुण शनिवारी लोणावळा परिसरात आले होते. परवाना प्राप्त पिस्तूल मधून त्यांनी एक गोळी हवेत झाडली.

एमपीसी न्यूज- लोणावळा येथील सहारा पुल परिसरात शनिवारी सायंकाळी परवानाधारक पिस्तूल मधून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी चार जणांवर भादंवि कलम 188, 269, 336, सह शस्त्र अधिनियम 30 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110,112,117 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील चार तरुण शनिवारी लोणावळा परिसरात आले होते. परवाना प्राप्त पिस्तूल मधून त्यांनी एक गोळी हवेत झाडली. मात्र सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडल्याने पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.