Lonavala News : समाजप्रेमी आप्पासाहेब खांडगे ऑक्सिजन पार्कचे कार्ला शाळेत उदघाटन

राज्यातील ऑक्सिजन निर्मिती करणारी पहिली शाळा मावळात

एमपीसीन्यूज : कोरोना संकटकाळात ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना कळाले असून ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्षारोपन करणे काळाची गरज असल्याने ‘चला ऑक्सिजन वाढवू या’ या हेतुने रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या सौजन्याने समाजप्रेमी कै. श्री आप्पासाहेब खांडगे ऑक्सिजन पार्कचे उदघाटन कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळा व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर काॅलेजमध्ये माजी राज्यमंत्री संजय भेगडे, प्रांतपाल रोटरी जिल्हा 31चे रोटरी मंजू फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, जिल्हा उपप्रांतपाल गणेश कुदळे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, रोटरी क्लब अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, सचिव सचिन कोळवणकर,प्राचार्य भगवान शिंदे, पर्यावरण संचालिका ज्योती नवघने, संचालक दामोदर शिंदे,संदिप पानसरे व सर्व रोटरीयन व संस्थेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

कोरोना संकटामुळे पर्यावरणाचे निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले तसेच ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना समजले आहे. हवेतील ऑक्सिजनचे नैसर्गिक प्रमाण कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने शक्य ते प्रयत्न केले पाहिजे प्रदूषण मुक्त हवा मिळावी या हेतूने महाराष्ट्रातील श्री एकविरा विद्या मंदिर पहिली शाळा असेल की जेथे ऑक्सिजन पार्क निर्माण करण्यात आले असल्याचे संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी सांगितले.

या ऑक्सिजन पार्कमध्ये व परिसरात जास्तीतजास्त ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या स्नेक प्लान्ट, ऐरिका पाम, क्रोटोन, प्लान्ट, रेपिक्स पाम, फाईकस रामतुळस, कृष्णतुळस, वैजंतीतुळस, कोरपड, कापुर, एक्झोरा, ट्रेसना, युग्लिनावडपिंपळ,अशा पाचशे ते साडे पाचशे वृक्षांची रोपे या उद्यानात व शाळेच्या परिसरात लावण्यात आली आहेत. तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन देखील करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष संजय भेगडे, संतोष खांडगे, मंजु फडके, गणेश कुदळे, रजनीगंधा खांडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

पर्यावरण संवर्धन कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य भगवान शिंदे, शिक्षक प्रतिनीधी संतोष हुलावळे, पर्यावरण प्रमूख सचिन हुलावळे,बाबाजी हुलावळे,उमेश इंगूळकर,काकासाहेब भोरे, मधुकर गुरव, विकास दगडे, दिलीप पोटे, वरुण दंडेल, प्रविण राऊत, शितल शेटे, अनुराधा हुलावळे, अरुणा बुळे, नाजुका सोनकांबळे, मिरा शेलार, शिल्पा वर्तक, प्रणाली उंबरे यांनी प्रयत्न केले.

प्रास्तविक रजनीगंधा खांडगे स्वागत भगवान शिंदे, सूत्रसंचालन उमेश इंगूळकर यांनी तर आभार दिलीप पोटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.