Lonavala News: आयएनएस शिवाजी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Lonavala News: Independence Day celebrations at INS Shivaji Lonavala News, Independence Day celebrations, at INS Shivaji, latest news in marathi, braking news in marathi,

एमपीसी न्यूज – भारतीय नौदलाचे लोणावळा येथील प्रमुख तांत्रिक प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजीवर 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

सोहळ्यादरम्यान कोविड-19 संबंधीची पुरेशी खबरदारी घेण्यात आली. कमांडिंग अधिकारी आणि आयएनए जवान आणि संरक्षण कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषक देऊन गौरवण्यात आले. स शिवाजीचे स्टेशन कमांडर कमोडोर रवनीश सेठ यांनी राष्ट्राच्या संरक्षणार्थ सर्वोच्च बलिदान दिलेल्या सागरी योद्ध्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

सर्व जवान आणि संरक्षण कर्मचाऱ्यांचे नौदल प्रमुखांनी कौतुक केले आणि दक्षिणी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिग इन चीफ यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. जवान आणि संरक्षण कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषक देऊन गौरवण्यात आले.

कमांडिग ऑफिसर यांनी उपस्थित जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.