Lonavala News: श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जितेंद्र टेलर

मंगेश बालगुडे (सचिव), आकाश परदेशी (खजिनदार) पदावर निवड करण्यात आली.

एमपीसी न्यूज- गवळीवाडा येथील श्रीराम नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र धीरजलाल टेलर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदावर चंद्रकांत बारोट यांची निवड करण्यात आली. यासह मंगेश बालगुडे (सचिव), आकाश परदेशी (खजिनदार) पदावर निवड करण्यात आली.

यावेळी श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी, नगरसेवक निखिल कविश्वर, सुधीर शिर्के, कल्पना अकोलकर, माजी उपनगराध्यक्ष धीरजलाल टेलर, संचालक ऍड. संदीप आगरवाल, संतोष हिरणवाळे, चंद्रशेखर उमठे, रेखा गवळी, संस्थेचे व्यवस्थापक अनिल बोंद्रे, लेखापाल माणिक धोकडे, रेखा हिरणवाळे, मंदार पिंगळे हे उपस्थित होते.

श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 1993 साली झाली. तेव्हापासून 2020 पर्यत म्हणजेच 27 वर्षाच्या कार्यकाळात उल्लेखनीय प्रगती केली आहे. संस्थेची आर्थिक उलाढाल 25 कोटी रुपयांची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.