Lonavala News: लोणावळा शहर पोलीस ठाण्याला ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ मानांकन

मागील काही वर्षांपासून लोणावळा शहर पोलिसांनी स्मार्ट उपक्रम राबवत शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले आहे. यापूर्वी पोलीस ठाण्याला आयएसओ प्रमाणपत्र देखील मिळाले होते.

एमपीसी न्यूज- लोणावळा शहर पोलीस ठाण्याला पुणे जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस ठाणे (A+) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

मागील काही वर्षांपासून लोणावळा शहर पोलिसांनी स्मार्ट उपक्रम राबवत शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले आहे. यापूर्वी पोलीस ठाण्याला आयएसओ प्रमाणपत्र देखील मिळाले होते.

पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी लोणावळा शहरात कायदा व सुव्यवस्था राखताना गुन्ह्यांची जलद गतीने उकल करणे, विविध सेलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले यांच्याकरिता निर्भयतेचे उपक्रम राबविले.

नागरिकांच्या सोबत सलोख्यांचे संबंध प्रस्थापित करत पोलिसांविषयी सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण केली. कोरोनाच्या संकट काळात देखील भरघोस कामे करत शहराला कोरोनामुक्त ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली. यासर्व बाबीचा विचार करून हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.