Lonavala News : लोणावळा परिसरातील प्रलंबित विकासकामांचा आमदार शेळके यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषद कार्यालयात नगरपरिषदेच्या हद्दीत सुरु असलेल्या विकासकामांची आमदार सुनील शेळके यांनी ( मंगळवार, दि.22) पाहणी केली.

बाजारपेठेतील अंतर्गत रस्ता प्रस्तावित भाजी मंडई, लोणावळा नगरपरिषद रुग्णालय, नांगरगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रास आमदार शेळके यांनी भेट देत आढावा घेतला. 2 कोटी 58 लक्ष निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असुन औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची डागडुजी व आवश्यक सोयीसुविधा उभारण्याबाबत, नगरपरिषदेत सुरु असलेली व प्रलंबित विकासकामे यांचा आढावा घेण्यासाठी आमदार शेळके यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

आमदार शेळके यांनी निवड झाल्यानंतर प्रथमच लोणावळा नगरपरिषद कार्यालयास भेट दिली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष सुधिर शिर्के, मुख्याधिकारी रवी पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

शहरातील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी राज्य सरकारकडून 41 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार शेळके यांनी यावेळी दिली.

‘लोणावळा शहर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. यासाठी अनेक प्रलंबित कामासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. विकासकामांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे नगरपरिषदेने सादर करावेत. विकासकामात राजकारण न करता सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, असे मत शेळके यांनी बैठकीत व्यक्त केले.

याप्रसंगी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष सुधिर शिर्के, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक राजू बच्चे, निखिल कवीश्वर, आरोही तळेगावकर, संजय घोणे, विशाल पाडळे, दिलीप दामोदरे, संध्या खंडेलवाल, विरोधी पक्ष गटनेत्या शादान चौधरी, सेजल परमार, सुनील इंगुळकर, सिंधू परदेशी, रचना सिनकर, मंदा सोनवणे, भरत हरपुडे, कल्पना आखाडे, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, गौरी मावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जीवन गायकवाड, महिला शहराध्यक्ष मंजुश्री वाघ व इतर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.