Lonavala News: ढाक भैरीच्या कड्यावरून पडल्याने पिंपरी-चिंचवडमधील गिर्यारोहकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील ढाक भैरीच्या कड्यावरून सुमारे 200 फूट खोल दरीत पडल्याने पिंपरी-चिंचवडमधील एका तरुण गिर्यारोहकाचा दुर्दैवी अंत झाला.

प्रचिकेत भगवान काळे (वय 32, पिंपरी चिंचवड) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ढाक भैरी येथील गुहेतून खाली उतरतत असताना हात सटकल्याने तो अंदाजे 200 फुट खोल दरीत पडला होता. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या दुर्घटनेत त्याचा दुदैवी मृत्यू झाला.

प्रचिकेत काळे (फाईल फोटो)

या घटनेची माहिती समजली तेव्हा अनिकेत बोकील व दिपक पवार हे त्याच भागातील कळकराय येथे क्लायबिंगसाठी रेकी करत होते. लगेचच ते ढाक भैरी येथील दरीकडे पोहचले. तदनंतर कामशेतचे अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, शुभम आंद्रे, अविनाश केदारी हे देखील त्यांच्या मदतीला पोचले.

पायऱ्यांमुळे प्रचिकेतचे मित्र व इतर ग्रुपचे सदस्य पण खाली पोचले होते. पण मार लागल्याने काहीच क्षणात त्याचा श्वास थांबला होता. शिवदुर्गची टीम देखील सर्व साहित्यांची जुळवाजुळव करत ढाकच्या दिशेने निघाली. कामशेत पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची कल्पना दिली.

तोपर्यत अनिकेत व दिपकने हालचाल करुन बॉडी पॅक केली व वर खेचण्यासाठी सेट अप लावला. अशा प्रकारच्या रेस्कूला फार मोठी टीम लागते. टेक्निकल टीम टेक्निकल काम करते, पण मृतदेह पुढे उचलून गाडीपर्यंत आणणे खूपच जिकीरीचे असते, मात्र रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य अष्टपैलू असल्याने त्यांनी दोन्ही बाजू संभाळून घेतल्या. आजच्या रेस्क्यू ऑपरेशनला इतरही ट्रेकर्स ग्रुपनी खूप सहकार्य केले.

अनिकेत बोकील, दीपक पवार, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अविनाश केदारी, चंद्रकांत बोंबले, रसिक काळे, रोहीत वर्तक, ओंकार पडवळ, अशोक उंबरे, सतीश मेलगाडे, महेश मसणे, गणेश गिद, विशाल मोरे, नेहा गिद, प्रियंका मोरे, नूतन पवार, ब्रिजेश ठाकूर, अनिकेत आंबेकर, ओंकार म्हाळसकर, गोपाळ भंडारी, सुनील गायकवाड यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन प्रचिकेतचा मृतदेह बाहेर काढला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III