Lonavala News : पोलीस कर्मचार्‍यांला मारहाण केल्याप्रकरणी 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : भांडणातील आरोपीला तपासाकामी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची समज दिल्याचा राग मनात धरत लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील (Lonavala News) पोलीस कर्मचारी याला लोखंडी राॅड व दगडाने मारहाण केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अजिज जब्बार सूब मेस्त्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल गौड, दिनेश मरवडी, आकाश चोर, विनायक शिंदे, प्रशांत शिंदे, वैभव साठे व इतर 2 ते 3 अज्ञात व्यक्ती (सर्व रा. ओळकाईवाडी कुसगांव ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 जानेवारी रोजी रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास कुसगाव ओळकाईवाडी येथील मंदिराचे पाठीमागे असलेल्या रोडवर घडली होती. यामध्ये अजिज मेस्त्री हे जखमी झाले आहेत.

Alandi News : महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असणाऱ्या ग्रिहिथाने पुन्हा एकदा रचला नवा विक्रम

लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये 29 जानेवारी रोजी भा.द.वि. कलम 324 अन्वेय गुन्हा दाखल झाला होता. त्यामधील आरोपी अतुल गौड यास गुन्हयाचे तपासकामी पोलीस स्टेशन येथे हजर राहण्याची समज दिल्याचा राग मनात धरून विनायक शिंदे याने हातातील दगडाने डोक्यात मारले व वैभव साठे याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत केली व इतरांनी हाताने लाथाबुक्याने मारहाण केली असल्याचे मेस्त्री यांनी फिर्यादीमध्ये म्हंटले आहे.

या मारहाणीत मेस्त्री यांच्या डाव्या डोळयाच्या खालील बाजुस फॅक्चर झाले असून नितीन नरवडे यालाही हाताने मारहाण झाली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये (Lonavala News) आज 1 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कारंडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.