Lonavala News : प्रसाद लोखंडे यांना अभियांत्रिकीमधील पीएच.डी

एमपीसी न्यूज – सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा यांत्रिकी विभागात कार्यरत प्राध्यापक प्रसाद एकनाथ लोखंडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान करण्यात आली. प्रा. लोखंडे यांच्या संशोधनाचा विषय नॅनो मटेरियल बेस्ड सुपरकपॅसिटर फॉर मेकॅनिकल अ‍ॅप्लीकेशन (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) होता.

प्रा. प्रसाद लोखंडे यांचा सिंहगड इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एम. एस. गायकवाड आणि एन.बी.एन. कॉमर्स कॉलेज प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे डॉ. उमेश चव्हाण हे लोखंडे यांचे संशोधनासाठी मार्गदर्शक होते.

लोखंडे यांनी आज पर्यंत चौदा नॅशनल आणि इंटरनॅशनल रिसर्च पेपर्स प्रकाशित केले आहेत. त्यांना या संशोधनसाठी सिंहगड इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले व सचिव डॉ. सुनंदा नवले, सिंहगड एज्युकेशन सोसायटी लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, विभाग प्रमुख प्रा. एस.एम. गायकवाड यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.