Lonavala News: शिवक्रांती कामगार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी संघटकपदी प्रतीक पाळेकर 

एमपीसी न्यूज – शिवक्रांती कामगार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी संघटकपदी प्रतीक विजय पाळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.  शिवक्रांती कामगार संघटनेचे वरिष्ठ चिटणीस गुलाबराव मराठे व खजिनदार रवींद्र साठे यांच्या हस्ते सदर नियुक्तीपत्र देण्यात आले. 

शिवक्रांती कामगार संघटनेचे पुणे जिल्ह्यातील तळेगाव, चाकण, हिंजवडी, रांजणगाव व शिरवळ औद्यागिक वसाहतीसह सातारा, नगर, औरंगाबाद येथे 350 हून अधिक कामगार युनिट आहेत.

संघटनेचे राज्यभरात संघटित व असंघटित असे पावणे दोन लाख कामगार सदस्य आहेत. महाराष्ट्रातील अग्रगण्य कामगार संघटना म्हणून ओळख असलेली शिवक्रांती कामगार संघटना आणखी मजबुत करण्यासाठी प्रतीक पाळेकर यांच्यावर संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रतीक पाळेकर यांनी उच्च शिक्षण घेतले असून त्याचे शिक्षण, नेतृत्व गुण, संघटन कौशल्य व वक्तृत्व याचा फायदा संघटना वाढीसोबत कामगारांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी होईल, असा विश्वास नियुक्तीच्या प्रसंगी गुलाबराव मराठे व रवींद्र साठे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III