Lonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी

55 जणांची अँन्टीजन टेस्ट; 1 जण पाॅझिटिव्ह

एमपीसी न्यूज : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या उपक्रमार्गंत कार्ला गावातील 498 कुटुंबातील 2324 नागरिकांची आज प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये वयस्कर व काही आजाराची लक्षणे असलेल्या 55 जणांची रॅपिड अँन्टीजन टेस्ट करण्यात आली. यापैकी 54 जणांचे अहवाल निगेटिव्ह व एक जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे, मावळ आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, मावळ आरोग्य समन्वयक गुणेश बागडे यांनी कार्ला गावात भेट देत तपासणी मोहिमेचा आढावा घेत नागरिकांची विचारपूस केली.

या मोहिमेच्या प्रारंभापुर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅ. भारती पोळ, झोनल अधिकारी रमेश गायकवाड यांनी तपासणी कामासाठी आलेले शिक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका अंगणवाडी सेविका, गावातील स्वयंसेवक यांना मार्गदर्शन करत नागरिकांचे स्क्रिनिंग कसे करायचे हे समजावून सांगितले.

यावेळी शिवसेनेचे पुणे उपजिल्हाप्रमख शरद हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळचे कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, माजी उपसरपंच किरण हुलावळे, अविनाश हुलावळे, प्रदिप हुलावळे, पोलिस पाटील संजय जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे, अनंता हुलावळे, शिवाजी म्हाळस्कर, नासीर पठाण, आर. थोरात, संतोष हुलावळे, अमोल सुतार यांच्यासह गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी व तरुण कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. आरोग्य तपासणी मोहिमेसाठी कार्ला गावात आज जनता कर्फ्यू पाळून सर्व व्यवहार बंद ठेवले होते.

या सर्वेक्षणासाठी गावात 11 टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यांनी गावात प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची थर्मल गन व ऑक्सिमिटरने तापमान व ऑक्सिजन पातळीची नोंद केली. यावेळी माहिती पत्रक भरताना नागरिकांना ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब, सर्दी, खोकला, घसा दुखणे, थकवा आहे का याची नोंद घेण्यात आली तपासासाठी प्रत्येक टीममध्ये शिक्षक, आरोग्यसेविका, व गावातील पन्नास ते साठ तरुणांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.