Lonavala News : आर्टिफिशीयल वॉल क्लायम्बिंग स्पर्धेत शिवदुर्गच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज – रत्नागिरीमधील डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या आर्टिफिशीयल वॉल क्लायम्बिंग स्पर्धेत लोणावळा येथील शिवदुर्गच्या क्लायम्बिंग जिमच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. सात खेळाडूंना या स्पर्धेत बक्षिसे मिळाली आहेत.

27 आणि 28 मार्च रोजी डेरवण  येथे 18 वर्षाखालील जिल्हास्तरीय आर्टिफिशीयल वॉल क्लायम्बिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत लोणावळा येथील शिवदुर्ग टीमच्या 25 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातील तीन स्पर्धा प्रकारांमध्ये सात खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केली आहे.

सब ज्युनिअर कॅटेगरी (मुले) या गटात आयुष वर्तक (प्रथम क्रमांक), प्रिन्स बैठा (तृतीय क्रमांक) यांना बक्षीस मिळाले. ज्युनिअर कॅटेगरी (मुली) या गटात साक्षी प्रभुणे (प्रथम क्रमांक), अदया नायर (द्वितीय क्रमांक), तनया कोळी (तृतीय क्रमांक) आणि ज्युनिअर कॅटेगरी (मुले) गटात रितेश कुडतरकर (प्रथम क्रमांक), ओम हारसुले (तृतीय क्रमांक) यांना बक्षीस मिळाले आहे.

सचिन गायकवाड, अनिकेत बोकील, दिपक पवार, गणेश गिध, रोहीत वर्तक, योगेश उंबरे, समिर जोशी, ओंकार पडवळ आदींनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिवदुर्ग टीमच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.