Lonavala News : मावळच्या कोरोनामुक्तीसाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस सहकार्य करा – आमदार सुनील शेळके

0

एमपीसीन्यूज : कोरोनाचा वाढत्या संसर्गाला आळा घालून संपूर्ण मावळ तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या आरोग्य मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही आरोग्य मोहीम महाविकास आघाडी सरकार राज्यभर राबवत आहे. या मोहिमेच्या मावळ तालुक्यातील पहिल्या टप्प्याला लोणावळा परिसरातून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी आमदार शेळके बोलत होते.

झालावाडी कोविड केअर सेंटरला भेट देऊन आमदार शेळके यांनी तेथील सोयीसुविधांची पाहणी करून रुग्णांशी, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

प्रांताधिकारी संदेश शिर्के, लोणावळा मुख्याधिकारी रवी पवार, नगरसेवक निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, नगरसेविका आरोही तळेगावकर, सेजल परमार, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल, कॉंग्रेस शहराध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जीवन गायकवाड, उद्योजक मुकेश परमार, पुणे जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस डॉ. किरण गायकवाड, महिला शहराध्यक्षा मंजुश्री वाघ, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, युवक अध्यक्ष सनी पाळेकर, विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्य कुटे, रविंद्र पोटफोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत स्वयंसेवक त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी व शारीरिक तापमान तपासणार आहेत.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर सातत्याने राखणे अशा विविध मार्गदर्शक सूचनांचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सहजपणे समावेश होण्यासाठी थेट संपर्क करून जनजागृती करणे हाही या मोहिमेचा उद्देश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.