Lonavala News : गॅस सिलेंडरचा अनाधिकृत साठा करत काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करा – मनसे

एमपीसीन्यूज : पवनानगर परिसरात गॅस सिलेंडरचा अनाधिकृत साठा करत काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसे रस्ते, अस्थापना व साधने विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप पोटफोडे यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे केली आहे.

पवनानगर परिसरात अधिकृत गॅस सिलेंडर वितरक असताना काही ठिकाणी अनाधिकृतपणे साठा कसा केला जातो आहे. यावर ग्रामीण पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

यावर पोटफोडे यांच्यासह विशाल लोंडे, भरत बोडके, पांडूरंग आसवले, अनिल वरघडे, राम साबळे, विजय भानुसघरे, मोझेस दास,संतोष खराडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

मनसे रस्ते अस्थापना व साधन सुविधा विभागाने दुसरे पत्र आयआरबी कंपनीला दिले आहे. यामध्ये त्यांनी विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

यामध्ये रस्त्याच्या लगत असलेले नाम फलक व सुचना फलकांवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे ती साफ करावी, वाढलेली झाडे छाटणी करावी, आवश्यकता असेल तेथे कॅटाझ, रिफ्लेक्टर व ब्लिंकर बसवावेत, साईड पट्टी खचलेल्या ठिकाणी भरणी करावी, पांढरे पट्टे मारणे, झेंब्रा काँसिंग व स्पिड ब्रेकर दुरुस्त करणे, नाले सफाई, क्रॅश बॅरियर व रोपची दुरुस्ती, द्रुतगती व राष्ट्रीय मार्गावर पडलेल्या भेंगा भरणे, खड्डे भरणे, रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजुला असलेली झाडे छाटणे, दुभाजक व किलोमिटर दगड लावणे, बोगद्यामधील तसेच रस्त्यांवरील नादुस्त लाईट दुरुस्त करणे आदी कामे तातडीने मार्गी लावावीत,आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.