Lonavala : हनुमान टेकडी येथे 250 जणांची नेत्रतपासणी

लोणावळा : जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था व व्हिजन स्पिंग यांच्या वतीने हनुमान टेकडी येथिल नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबीरात 250 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन शिवसेना अवजड वाहतूक सेना उपतालुका प्रमुख नरेश काळविट हस्ते करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख शंकर गरवड, नाजिम बागवान, दिपक जायगुडे, संतोष कुडले, ज्ञानदेव आखाडे, सुनिल तिकोने, विवेक बेदरकर हे उपस्थित होते.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या वतीने जागोजागी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी वाकसई, कार्ला, डोंगरगाव या भागामध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.