Lonavala News : भुशी डॅम आणि इतर ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी, 263 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटक लोणावळ्यातील अनेक ठिकाणे व भुशी डॅमवर गर्दी करताना दिसून येत आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून पर्यटनाला बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलीस माघारी पाठवत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे तसेच, पोलिसांना अशा प्रकरणी लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही नागरिकांनी भुशी डॅम आणि इतर ठिकाणांवर पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई वरुन नागरिक याठिकाणावर येत आहेत.

भुशी डॅम, लायन पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणांवर पर्यटकांनी प्रामुख्याने गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पर्यटक पोलिसांना खोटे कारण सांगून पर्यटन स्थळांवर जात आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून, पोलीस पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. शनिवारी 263 नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत 1.23 लाख रुपये एवढा दंड वसूल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.