Lonavala Crime News : राहुल शेट्टी खून प्रकरणी दोन जणांना पोलीस कोठडी

एमपीसीन्यूज : लोणावळा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल उमेशभाई शेट्टी यांच्या खूनप्रकरणी लोणावळा शहरातील पाच जणांसह एका अज्ञाताच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमवरी दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज न्यायालयाने 31 आँक्टोबरपर्यत पोलीस कोठडी दिली आहे.

राहुल शेट्टी यांच्या पत्नी सौम्या राहुल शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोबिन इनामदार (वय 35, रा.भैरवनाथ नगर कुसगाव लोणावळा), कादर इनामदार (वय 33, रा. भांगरवाडी लोणावळा), सुरज अगरवाल (वय 42, रा. वर्धमान सोसायटी लोणावळा), दिपाली भिल्लारे (वय 39, रा. भांगरवाडी लोणावळा), सादीक बंगाली (वय 44, रा. गावठाण लोणावळा) व एक अज्ञात आरोपी (नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यापैकी सुरज अगरवाल व दिपाली भिल्लारे यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता 31 आँक्टोबरपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आल्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल उमेश शेट्टी हे सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरा जवळील चहाच्या दुकाना शेजारील कट्टयावर बसलेले असताना, पुर्ववैमनस्यांतून राहूल यांच्या विरोधकांनी त्यांना जिवे ठार मारण्याचा कट रचून संगनमत करुन अज्ञात हल्लेखोरांना सुपारी देत त्यांचा खून केला. त्यांच्या डोक्यात व तोंडावर बंदुकीतून गोळ्या झाडून तसेच धारधार शस्त्राने वार करुन त्यांचा खून केला.

या घटनेची माहिती समजताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्यासह लोणावळा उपविभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

तसेच पोलिसांची सहा पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना केली. तर अटक आरोपींकडून कसून तपास सुरू आहे. आज दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी लोणावळा शहरात येऊन गुन्ह्यांचा व तपासाचा आढावा घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.