Lonavala News: खंडाळा घाटात डोंगर‍ावरून निखळलेले दोन दगड सुरक्षा जाळीत आडकल्याने टळला मोठा अनर्थ

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलालगतच्या टेकडीवरील भल्या मोठ्या दोन दगडी अचानक निखळल्या पण सुदैवाने त्या टेकडीवरील संरक्षक जाळीचे काम पूर्ण झालेले असल्याने त्या जाळीतच अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या घटनेची माहिती समजल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने तत्काळ दरडी हटविण्यासाठी आपत्कालीन पथकाला प्राचारण केले. त्या पथकाने संरक्षक जाळीत अडकलेले दोन्ही भलेमोठे दगड ड्रिल मशीन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या जागेवर फोडून दरडीचा संभाव्य धोका दूर केला आहे.

सदर डोंगराला जाळी नसती तर मात्र दगड रस्त्यावर अथवा वाहनांवर पडून मोठा अनर्थ घडला असता अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.