Lonavala News : युवासेना पदाधिकार्‍यांनी युवक आणि विद्यार्थ्यांची एकजूट करावी : राजेश पळसकर

एमपीसीन्यूज : युवासेनेचा पदाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या युवा सैनिकांनी जबाबदारीने काम करावे. काॅलेज कक्षाच्या माध्यमातून युवक व विद्यार्थी युवासेनेला कसा जोडला जाईल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन युवासेना विस्तारक व मावळ लोकसभा संपर्कप्रमुख राजेश पळसकर यांनी केले.

मावळ विधानसभा क्षेत्रातील युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्ला येथे पार पडला. त्यावेळी उपस्थित युवा सेना पदाधिकारी आणि युवा सैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, शिवसेना तालुका महिला आघाडी संघटिका अनिता गोणते, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, भाविसे पुणे जिल्हा उपशहर संघटक रज्जाक मण्यार , युवासेना तालुका समन्वयक दत्ता केदारी, युवासेना चिटणीस (मावळ ग्रामीण) प्रसाद हुलावळे, युवासेना चिटणीस (मावळ शहरी विभाग) विनायक हुलावळे, युवासेना उपतालुका अधिकारी विजय तिकोणे,दिनेश पवळे (मावळ ग्रामीण), विशाल दांगट (मावळ शहरी विभाग), तसेच तालुक्यातील युवासेना विभाग अधिकारी, उपविभागीय अधिकारी, शाखा अधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

प्रास्ताविकात युवासेना मावळ विधानसभा अधिकारी शाम सुतार यांनी युवासेनेच्या आगामी वाटचालीची माहिती दिली. तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या दौर्‍यांमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कक्षचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे यांनी आभार मानले.

 युवासेना पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या चौकटीत राहून काम करावे. वैयक्तिक हेवेदावे बाजुला ठेऊन एकमेकांवर नाराज न होता सगळ्यांना सोबत घेऊन काम करावे. युवा सेना बळकट करून शिवसेना मजबूत करीत मावळातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ‘गाव तिथे युवासेना शाखा व घर तिथे युवा सैनिक’, तयार करण्याचे नियोजन करावे. अनिकेत घुले : युवासेना जिल्हा समन्वयक . 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.