Lonavala News : पुणे-मुंबई एक्स्प्रेस टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा!

एमपीसी न्यूज : ख्रिसमस सण, विकेंड आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पुण्या- मुंबईच्या पर्यटकांनी गोवा, कोकणात खासगी वाहनांनी जाण्यासाठी प्रचंड गर्दी केल्यामुळे पुणे -मुंबई एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, सकाळी 10 च्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ एका लक्झरी बसला आग लागल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे दुतर्फा वाहतूक कोंडीत भर पडली.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पर्यटनस्थळावर नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन करूनही नागरिकांनी याला प्रतिसाद दिला नसल्याचे आज सिद्ध झाले.

एक्स्प्रेस हायवे प्रशासनाच्या माहितीनुसार, खोपोलीकडे वळणाऱ्या मार्गावर तसेच बोरघाटात वाहतुक कोडींसह वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक कासवगतीने सुरू आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन तैनात करण्यात आले असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतील, असे सांगण्यात आले.

शुक्रवार 25 डिसेंबर, 26 आणि 27 डिसेंबरला शनिवार रविवार आल्यामुळे सलग तीन दिवसांचा प्लॅन करून पर्यटकांनी कोकण, गोव्यासह मुंबईला जाणे पसंत केले.

परंतु, आज सकाळी विकेंडसाठी पुण्याच्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस हायवेच्या दुतर्फा मार्गांवर वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती.

लोणावळा-खंडाळा येथील घाटातही वाहतूक कोंडीमुळे संथगतीने वाहतूक सुरू आहे. खालापूर टोलनाक्यावर तर वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.