Lonavala: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निखिल कविश्वर

Lonavala: Nikhil Kaviswar appointed as a General Secretary of Maharashtra Pradesh Youth Congress

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील नगरसेवक निखिल कविश्वर यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आज नियुक्ती करण्यात आली.

लोणावळा शहर युवक काँग्रेसपासून राजकारणात पदार्पण केलेले कविश्वर हे लोणावळा नगरपरिषदेत दोन वेळा स्वीकृत नगरसेवक राहिले आहेत.

पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदावर काम करत असताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस पक्ष वाढविण्यासोबत युवकांचे संघटन तयार करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदावर नियुक्ती करण्यात आली.

कविश्वर यांच्या या नियुक्तीमुळे लोणावळा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे कविश्वर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.