Lonavala : तिकोना गडावर रात्री मुक्काम केल्यास होणार कारवाई

एमपीसी न्यूज – किल्ले तिकोणागडावर रात्रीच्या वेळी काही हौशी पर्यटक येऊन रात्री मुक्काम करण्याचे प्रमाण जास्त वाढु लागले आहे. त्यामुळे गडावर अस्वच्छता पसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही पर्यटक गडावर मद्यपान, धुम्रपान, मांसाहारही करतात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड करतात, गडावर धांगडधिंगाही घालतात. गडावर पाहिजे तसे वागतात त्यामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात येत चालले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या बाबींचा विचार करता शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने पुरातत्व विभाग यांनी सदर प्रकरणात दखल घ्यावी अशी विनंती करता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी संबंधित लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व तिकोणापेठ ग्रामपंचायत यांना गडावर रात्री मुक्काम करणाऱ्यांवर आपल्या मार्फतीने तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी लेखी सूचना पत्रान्वये केली आहे.

सदर सूचनेनुसार किल्ले तिकोणागडावर रात्रीच्या वेळी मुक्काम करताना आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत व पुरातत्व विभाग यांचेकडुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.