BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : राष्ट्रीय हरित लवादाकडून नोडल समितीला 15 लाखांचा दंड!

एमपीसी न्यूज – नदीपात्रातील बांधकामांबाबत अहवाल सादर न केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडून नोडल समितीला सुमारे 15 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या समितीमध्ये तहसीलदार मावळ, लोणावळा नगरपरिषद सहाय्यक नगररचनाकार, विभागीय अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण बोर्ड व भूमी अभिलेख अधिकारी याचा समावेश आहे.

लोणावळा शहरातील सर्व्हे नं. 24 हा नदीपात्रालगत असून याठिकाणी मुरुमाचा भराव व अतिक्रमण करत नदीपात्र वळविण्यात आले असल्याची तक्रार आशिष शिंदे व इतर यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केली होती.

या तक्रारीच्या सुनावणी दरम्यान 27 फेब्रुवारी 2019 रोजी नोडल समितीने सदर जागेबाबत सर्व्हे करत हरित लवादाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश लवादाने दिले होते.

मात्र, वेळेवर अहवाल सादर न झाल्याने यापूर्वी लोणावळा नगरपरिषद व इतर यांना पाच लाखांचा दंड करण्यात आला. यानंतर अहवाल सादर करण्याकरिता देण्यात आलेल्या 1 मे 2019 या मुदतीत देखील अहवाल सादर केला न गेल्याने नोडल समितीला हरित लवादाने 15 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. एकाच प्रकरणाकरिता दोन वेळा दंड झाल्याने या दंडाबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमणाबाबत चर्चा सुरु आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like