Lonavala : भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर शनिवार, रविवारी अवजड वाहनांना बंदी!

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील भुशी धरण आणि लायन्स पाँईटकडे जाणार्‍या मार्गावर शनिवार आणि रविवार या दिवशी होत असलेली वाहतूककोंडीची समस्या कमी करण्याकरिता शनिवार आणि रविवार धरणाकडे जाणार्‍या मार्गावर अवजड वाहनांना तसेच लक्झरी बसेसला बंदी घालण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी दिली.

पावसाळा सुरु झाल्यानंतर मागील दोन्ही शनिवार व रविवार भुशी धरण व लायन्स पाँईटकडे जाणार्‍या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे.

  • याकरिता शनिवार आणि रविवार धरण मार्गावर अवजड वाहने तसेच प्रवासी घेऊन येणार्‍या लक्झरी बसेस यांना बंदी घालण्यात येणार आहेत. शनिवारी सकाळपासूनच ही वाहने बंद करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.