Lonavala : ओमकार तरुण मंडळ ठरले ‘लोणावळा गणराया पुरस्कार’चे मानकरी

'महाराष्ट्र मातंग समाज'मंडळाने पटकाविला दुसरा क्रमांक

एमपीसी न्यूज -लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गणपती उत्सवात घेण्यात आलेल्या गणराया अँवार्ड 2019 या स्पर्धेत तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. सिद्धार्थनगर गावठाण येथील महाराष्ट्र मातंग समाज मंडळाने द्वितीय तर खंडाळा येथील संत रोहिदास मित्र मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला मिळविला. नेहरू मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ व अष्टविनायक मित्र मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तर नेहरू मित्र मंडळ व नेताजी राणा प्रताप मित्र मंडळ हे उत्कृष्ट देखाव्याचे मानकरी ठरले.

लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणराया अँवॉर्ड 2019 या स्पर्धेत गणेशोत्सव काळात शहरातील ५० मंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मंडळांची उपक्रमशीलता, महिलांचा सहभाग, देखावे व देखाव्यातून देण्यात आलेले सामाजिक संदेश, गणेशोत्सव काळात आवश्यक असणाऱ्या परवानग्या, सुरक्षा व्यवस्था, मिरवणुकीतील शिस्त, सजावट, ध्वनी क्षमता अशा वेगवेगळ्या मानकांच्या आधारे 10 जणांच्या परीक्षण समितीने या सहभागी मंडळांचे परीक्षण केले होते.

लोकवर्गणीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गणराया अँवॉर्ड पारितोषिक वितरण कार्यक्रमातून हिंदु मुस्लिम ऐक्य व जातीय सलोख्याचा संदेश देण्यात आला. तसेच कोल्हापुर येथिल आघाडीचे गायक महेश हिरेमठ यांच्या अंतरंग या मराठी, हिंदी गीतांच्या व नृत्य कार्यक्रमाने सोहळ्यात रंगत आणली.

गणेश उत्सवात महिलांचा सहभाग व वर्षभरातील उपक्रमशील मंडळ म्हणून तुंगार्ली येथील ओमकार तरुण मंडळ, सामाजिक संदेश देणारे मंडळ म्हणून सिध्दार्थनगर येथील महाराष्ट्र मातंग समाज मंडळ, उत्तम सजावट व शिस्तबध्द मिरवणूकीसाठी शिवाजी मित्र मंडळ, सर्वोत्तम देखाव्यासाठी नेहरू मित्र मंडळ व नेताजी राणाप्रताप मित्र मंडळ यांना तर शिस्तबद्ध मिरवणूक मंडळ म्हणून तुफान मित्र मंडळ यांनी मान्यवर व प्रायोजकांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी (आयपीएस) नवनीत कुमार काँवत, संशोधन क्षेत्रातील उच्च अधिकारी नितिका काँवत, लोणावळा शहर पोलीस निरिक्षक बी.आर.पाटील, राष्ट्रीय महिला कबड्डीपट्टू लक्ष्मी भगवंतराव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी, विलास बडेकर, मंजुश्री वाघ, सुनील इंगूळकर,भारत चिकणे, आदींसह अनेक मान्यवर अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, पोलीस कुठुंबिय व गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यमाचे सूत्रसंचालन अमोल कसबेकर यांनी केले तर प्रास्ताविक पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.

मुस्लिम समाजाकडून चहा बिस्किटचे वाटप
‘गणराया अँवार्ड 2019’ या सोहळ्याकरिता आलेले मान्यवर व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांना लोणावळ्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने कार्यक्रमाच्या दरम्यान चहा व बिस्किटचे वाटप करत हिंदु मुस्लिम ऐक्य व सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून गणेश उत्सव काळासह सर्व धार्मिक कार्यक्रमात शहरात शांतता व सलोखा राखण्याचे नियोजन करण्यात आले होते. बक्षिस वितरण सोहळ्यात देखिल याची अनुभुती आल्याने नागरिकांनी पोलीस दलाला कौतुकाची थाप दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.