Lonavala : द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात पुन्हा दरड कोसळली

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. या दुर्घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

द्रुतगती मार्गावरील किलोमीटर 41/800 याठिकाणी तिन दिवसापुर्वी दरड पडली होती. त्याठिकाणी काम सुरु असताना आज पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली, ती दरड ठिकाणी दुरुस्ती कामासाठी उभ्या असलेल्या टेम्पोवर पडल्याने टेम्पोजवळील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

  • मुंबई लेनवर ही दरड पडल्याने मुंबईकडे जाणार्‍या दोन लेन बंद झाल्या आहेत. घटनेची माहिती समजताच बोेरघाट पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून वाहतुक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.