BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : एकविरा देवस्थानच्या देणगी पावत्यांमध्ये खाडाखोड करून दीड लाखांचा अपहार!

एमपीसी न्यूज – वेहेरगाव येथील एकविरा देवस्थान ट्रस्टच्या देणगी पावत्यांमध्ये खाडाखोड करून सुमारे 1 लाख 64 हजार 415 रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 ते 30 जून 2019 या कालावधीत घडली.

मंगेश प्रभाकर गायकवाड (वय 39, रा. लोणावळा) यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रवीण भीमराव ठाकर (रा. वेहेरगाव. मूळ रा. थोरण) या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेहेरगाव येथे असलेल्या एकविरा देवी मंदिर ट्रस्टमध्ये आरोपी व्यवस्थापक आहेत. पावती पुस्तकाने जमा झालेली देणगी रोजच्या रोज फिर्यादी मंगेश यांच्याकडे जमा करण्याचा नियम आहे. मात्र, आरोपींनी 6 ते 30 जून 2019 या कालावधीत पावती पुस्तकाने जमा झालेली 1 लाख 64 हजार 415 रुपयांची देणगी जमा केली नाही. त्या देणगीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्याचा अपहार केला.

तसेच देणगी पावत्यांमध्ये खाडाखोड करून मंदिर समितीची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.