Lonavala : पाटण गावात गावठी कट्टयासह  एकाला अटक 

One arrested with Gawthi Kattaa in Patan village

 एमपीसीन्यूज : पाटण, मळवली येथे गावठी कट्टयासह एक जणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली.  गुरुवारी (दि.4) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

महाराजसिंग दोहारे (वय 30 वर्ष रा. रामपुरा मध्य प्रदेश सध्या रा. पाटण, मळवली), असे  आरोपीचे नाव आहे. एक व्यक्ती कंबरेला  लोखंडी बनावटीचे गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली.

त्यानुसार  लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस हवालदार कैलास लबडे, आण्णा बनसोडे, अमित ठोसर, शरद जाधवर यांच्या पथकाने पाटण गावात धाव घेतली.

तेथे या पथकाने  दोहारे याची अंगझडती घेतली त्याच्याजवळ  गावठी पिस्तुल मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी   त्याच्या विरुद्ध  गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.