Lonavala : दुचाकीच्या धडकेत अनोळखी पादचारी ठार

एमपीसी न्यूज- जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर कार्ला गावाजवळ असलेल्या सुरज ढाब्यासमोर दुचाकीची धडक बसल्याने अनोळखी पादचारी नागरिकांचा मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकाने ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली.

ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णवाहिका चालक अजित शिंदे यांना सदर अपघाताबाबत फोन आला. ते घटनास्थळाकडे गेले असता त्याठिकाणी दुचाकीचालक व अंदाजे 50 ते 55 वयोगटातील एक इसम जखमी अवस्थेत पडले होते. रुग्णवाहिका चालकाने त्या दोघांना कामशेत येथील महावीर रुग्णालयात नेले असता सदर अनोळखी पादचारी इसम उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असल्याने त्याला वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर मृत व्यक्तीच्या अंगावर काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व निळ्या रंगाचे जर्किंग आहे. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. सदर व्यक्ती विषयी कोणास माहिती असल्यास त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक रफिक शेख हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.