Lonavala : आषाढी एकादशीनिमित्त पुरंदरे शाळेत बालचमूंची दिंडी

एमपीसी न्यूज – आषाढी एकादशी निमित्ताने आज लोणावळा येथील डाॅ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या वतीने शाळेची दिंडी काढण्यात आली होती.

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आळंदी देहू पासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरला जातात. वारीची ही परंपराा संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी तसेच प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा याकरिता सदर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुले व मुली संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, जनाबाई, नामदेव, सोपानदेव यांची वेशभुषा करुन सहभागी झाले होते.

  • दिंड्या पताका हातात नाचवीत, विठुरायाचा व ग्यानबा तुकारामाचा गजर करत पालखी काढण्यात आली होती. सहयाद्री नगर हुडको कॉलनी मधील मंदिरापर्यंत पालखी नेण्यात आली. या ठिकाणी माजी नगरसेविका जयश्री काळे आणि येथील रहिवाशांनी पालखीचे स्वागत व पूजन केले. तसेच विदयार्थ्यांना खाऊ वाटप केले.

शाळेचे मुख्याध्यापक आनंद गावडे, सरला वीरकर, रसिका जगदाळे, जयश्री वाघमारे, नेहा सोनवणे ह्या शिक्षक वर्गाने या दिंडीचे संयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.