Lonavala : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या टीसीवर देशद्रोह‍ाचा गुन्हा दाखल: रेल्वेमधून निलंबन

एमपीसी न्यूज – पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात असताना शिवाजी चौकात पाकिस्तान जिंदाब‍दच्या घोषणा देणार्‍या रेल्वेच्या एका टिसीवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात देशद्रोह‍ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत रेल्वे प्रशासनाने देखील त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.

उपेंद्रकुमार श्रीवीर बहादुरसिंग (वय 39, रा. पटणा, राज्य -बिहार, सध्या राहणार रेल्वे क्वार्टर, लोणावळा) असे या टिसीचे नाव असून तो लोणावळा स्थानकावरच कामाला आहे. त्याला पोलीसांनी त‍ाब्यात घेतले आहे. दरम्यान सर्व पक्षियांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जात उपेंद्रकुमारवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी कारवाई केली असल्याचे सांगत पोलीस निरीक्षक पाटील यांनी जमावाला शांत केले.

प‍किस्त‍ानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
जम्मू काश्मिरमधील पुलनामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचा आज लोणावळा शहरात निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सकाळच्या सत्रात प्रथम शिवसेनेच्या वतीने पाकिस्त‍नच्या विरोधात घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन केले.

  • यावेळी शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, लोणावळा शहरप्रमुख सुनिल इंगूळकर, तालुका समन्वयक बाळासाहेब फाटक, शिवदास पिल्ले, सिंधु परदेशी, संजय भोईर, जयवंत दळवी, मनिषा भांगरे, मनिष पवार, श्याम सुतार हे उपस्थित होते.

तदनंतर नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षियांनी एकत्र येत निषेध नोंदवत पाकिस्तानचा ध्व्ज आणि प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत संताप व्यक्त केला. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक देवीदास कडू, संध्य‍ खंडेलव‍ाल, भरत हारपुडे, विनय विद्वांस, मंदा सोनवणे, जितेंद्र बोत्रे, मनविसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, मनसेचे शहराध्यक्ष भारत चिकणे, अरुण लाड, सुनिल त‍ावरे, हर्षल होगले, दीपक कांबळे, उमेश तारे, अक्षय जाचक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.