Lonavala : पार्थ पवार यांनी केली उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेची पाहणी

Parth Pawar inspected the premises of Sub-District Hospital

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरात लवकरच शासनाचे शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. या कामाची जागा व बांधकाम आराखडे याची पाहणी आज राष्ट्रवादीचे युवानेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केली. लवकरात लवकर हे काम सुरु होण्यासाठी आवश्यक असणार्‍या शासनाच्या परवानग्या व निधी मिळवून देण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले.

राज्यात सर्वत्र कोरोनाचे सावट वाढत असताना लोणावळा सारख्या मोठ्या शहरात शासकिय रुग्णालय नसल्याने मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी लोणावळ्यात मंजुर असलेले शासकिय रुग्णालयाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. पार्थ पवार आज तळेगावात आले असताना त्यांना जाणिवपुर्वक लोणावळ्यात आणत येथील रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचा मानस व्यक्त केला.

लोणावळा नगरपरिषदेचे डाॅ. बाबासाहेब डहाणूकर रुग्णालय मागील तेरा वर्षापासून बंद अवस्थेत आहे. तिन वर्षापुर्वी या रुग्णालयाची इमारत व जागा नगरपरिषदेने ठराव करून शासनाकडे वर्ग केली आहे. याठिकाणी शंभर खाटाचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. तिन वर्षापासून याकामात सतत काही ना काही अडथळे येत होते, आता देखील आराखडे अंतिम मंजुरीसाठी असताना नगररचना विभागाकडून पुन्हा दुरुस्ती सुचवत नविन नकाशे मागविण्यात आले होते.

आता नविन नकाशे देखील तयार करण्यात आले आहे. शासनाकडून या कामासाठी निधी देखील उपलब्ध होणार असल्याने पार्थ पवार यांचा पाठपुरावा ह्या कामाला गती देण्यासाठी महत्वाचा ठरणार असल्याने आमदार शेळके यांनी आज पार्थ पवार यांच्या समवेत जागेची पाहणी व नकाशे पाहणी केली. तर रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या सामाजिक सभागृहात नागरिकांच्या सुविधेकरिता ओपीडी सुरू करण्याची सुचना मुख्याधिकारी रवी पवार यांना केली.

यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या व शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, लोणावळा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश परमार, नगरसेवक भरत हारपुडे, सिंधु परदेशी, कल्पना आखाडे, बाळासाहेब कडू, अनिल मालपोटे, गणेश तिथे, अविनाश ढमढेरे, अशोक ढाकोळ, दीपक मालपोटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.