Lonavala : लोणावळा मॅरेथॉनच्या उदघाटनाला पार्थ पवार यांची उपस्थिती

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहरात राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोणावळा मॅरेथॉनला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सकाळी सात वाजताच हजेरी लावली. पार्थ यांची ही उपस्थिती भविष्यातील राजकीय वाटचालीची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मावळ लोकसभेकरिता पार्थ यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे.

पार्थ पवार लोणावळ्यात येणार आल्याने शहरातील सर्व रस्त्यावर पदाधिकार्‍यांनी पक्षाचे झेंडे, स्वागत कमानी व स्वागताचे बोर्ड लावत शहर राष्ट्रवादीमय करण्यात आले होते. पार्थ यांच्या हस्ते भाजी मार्केट चौकात मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक, पालक असे हजारो नागरिक सहभागी झाले होते. भाजी मार्केट चौक ते भांगरवाडी, पंडीत नेहरु मार्ग, सिध्दार्थनगर, मावळा पुतळा चौक, जयचंद चौक मार्गे पुन्हा भाजी मार्केट चौक अशी ही मॅरेथॉन झाली.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, संत तुकारा सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, मावळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, लोणावळा शहर महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, बाळासाहेब पायगुडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कडू, नितिन शहा, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, राजु बोराटी, रवी पोटफोडे, भूषण पाळेकर, सोमनाथ गायकवाड, राजेश मेहता, कुमार धायगुडे, अमोल गायकवाड, मनोज लऊळकर, दत्तात्रय गोसावी, संतोष कचरे, शीला बनकर, वकील सेलचे अध्यक्ष शेलार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.