Lonavala: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी औषध फवारणी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोणावळा येथील नियोजित कार्यक्रम स्थळावर ते येण्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून औषध फवारणी करण्यात आली होती.

 

_MPC_DIR_MPU_II
लोणावळा शहरातील एका हॉटेलच्या उद्घाटनाकरिता अजितदादा आले होते. पुण्यामधील कोरोना संदर्भातील एक मिटींग संपवून अजितदादा लोणावळ्यात येणार असल्याने ते येण्यापूर्वी खबरदारी म्हणून  आयोजकांकडून कार्यक्रम स्थळावर औषध फवारणी करण्यात आली होती. देशासह महाराष्ट्रावर सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट असल्याने गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन केले जात असले तरी अजितदादा यांच्या कार्यक्रमाला गर्दी होणार हे निश्चित होते. या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून खबरदारी घेण्यात आली होती.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादा यांनी हस्तांदोलन करण्याचे बंद केले आहे यावर बोलताना दादा म्हणाले की, बाहेर एखाद्याला राग आला तरी चालेल हस्तांदोलन करू नका, अशी टिपण्णी केली. महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले रुग्ण पुण्यात आढळल्याने सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही दादांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.