HB_TOPHP_A_

Lonavala : मकर संक्रांतीनिमित्त कॅथ्रिडल विद्या स्कूलमध्ये पतंग महोत्सव

24

एमपीसी न्यूज- मकरसंक्रांतीचा सण शिलाटणे गावातील कॅथ्रिडल विद्या स्कूलमध्ये पतंग महोत्सवाने साजरा करण्यात आला. 70 मुलांनी शाळेच्या क्रीडांगणावर सकाळच्या आल्हाददायी वातावरणात एकाच वेळी पतंग उडवत आनंद साजरा केला.

HB_POST_INPOST_R_A

मकरसंक्रात हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या मुलांना व्हावी ह्या हेतूने विद्यालयाचे मुख्याध्यापक डाॅ. अनिंदा चटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थी व शाळेचे शिक्षक यांनी एकत्रितपणे पतंगबाजीचा आनंद घेतला.

‘ढिल ढिल दे…दे…रे…भैया’ म्हणत एकाहून एक आकर्षक पतंग उडवत खेळीमेळीच्या चढाओढीत क्षणाक्षणाला ‘ओ काट, ओ भाग’ असे म्हणत पतंग उडवण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. कॅथ्रिडल या शाळेत भारताच्या विविध भागातील तसेच इतर देशांमधील विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतांश विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असल्याने त्यांना सणवारांची माहिती व्हावी याकरिता सदरचा उपक्रम राबविण्यात आला होता.

पतंग महोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी मुख्याध्यापक डाॅ. चटर्जी यांनी मुलांना मकरसंक्रांतीच्या सणाविषयी माहिती दिली. मकरसंक्रांतीला सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करत असल्याने हा एक सक्रमणाचा सण असून या दिवसापासून हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होते. तसेच दिवस मोठा व रात्र लहान होण्यास सुरुवात होते, यामुळे ह्या सणाला धार्मिकते सोबत शास्त्रीय महत्व सुद्धा असल्याचे चटर्जी यांनी मुलांना सांगितले. मुलांनी या वेळी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद घेतला.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: