Lonavala : ओळकाईवाडीत जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त, सरपंचाच्या पतीसह १३ जणांवर गुन्हा

Police raid gambling den in Olakaiwadi; One lakh worth of property confiscated, crime against 13 including Sarpanch's husband

एमपीसीन्यूज : लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील ओळकाईवाडी येथे एका घरात चालू असलेल्या जुगार अड्डयावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याठिकाणी जुगार खेळण्यासाठी आलेले कुसगाव ग्रामपंचायचे सदस्य तसेच विद्यमान सरपंच यांचे पती व अन्य १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

सोमनाथ नारायण घारे (वय-५०, रा. शिवणे, मावळ), सुभाष सीताराम बोडके (वय-३२, रा. खंडाळा), अरुण शिवराम शिर्के (वय-३५), राजू परमाजी नेपाळी (वय-४२), राजेश बबन काटकर (वय-२२), भगवंत अनंता डफळ (वय-४२), शुभम दत्तात्रय दळवी (वय-२४), रमेश सुभाष ठोंबरे (वय- ३४), नितीन दत्तात्रय मानकर (वय-४७, सर्व रा. ओळकाईवाडी, कुसगाव, लोणावळा), गणेश बाबू तेलंग (वय-३९, रा. भैरवनाथनगर, कुसगाव), भरत हरी गुंड (वय-५४), महेंद्र मनोहर गाडे (वय-२९), नंदू दिलीप गायकवाड (वय-३१, सर्व रा. कुसगाव, लोणावळा) अशी जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळ्याजवळील ओळकाईवाडी येथे राहणाऱ्या रमेश सुभाष ठोंबरे यांच्या घरात जुगार खेळत असल्याची माहिती पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार महाडिक व वाघमारे यांच्या पथकाने ठोंबरे यांच्या घरावर छापा टाकत तीन पत्ती हा जुगार प्रकार खेळणाऱ्या 13 जणांना ताब्यात घेत त्यांच्या कडील सुमारे 97 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी 13 जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात जुगार व कोविड-19 अंतर्गत कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस नाईक शकील शेख हे करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.