Lonavala : जुगारच्या अड्डायावर पोलिसांचा छापा; तीसजण ताब्यात, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – येथील प्रिछलीहिल भागातील एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगरीच्या अड्डायावर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकत ३३ लाखांचा मुद्देमालासह ३० जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेले २५ जण हे गुजरात राज्यातील रहिवासी असून ४ जण राजस्थानचे तर एकजण लोणावळा शहरातील आहे. हे सर्वजण जुगार खेळण्यासाठी लोणावळ्यात आले होते.

शनिवारी रात्री गस्तीला असणारे पोलीस उप निरीक्षक मृगदीप गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोणावळा पोलिसांनी पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिछलीहिल भागात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, एका बंगल्याच्या बाहेरील बाजूस काही गाड्या उभ्या असल्याच्या आढळून आल्या. त्या बंगल्याचा कानोसा घेतला असता आतून अनेक लोकांचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. त्याआधारे गायकवाड यांनी पोलीस स्टेशनला फोन करून जादा पोलीस कमुक मागवून घेतला.

  • बाहेर पोलीस आल्याची कुणकुण लागताच बंगल्यात जुगार खेळत बसलेल्या व्यक्तींनी बंगल्याच्या बाहेर पडून बाजूलाच असलेल्या एका तीव्र उतार असलेल्या टेकडीवरून उड्या टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून या सर्वांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये पोलीस उप निरीक्षक मृगदीप गायकवाड, पो.ना. अमोल कसबेकर, पोलीस काँन्स्टेबल जी.बी.होले, आर.के.कोळी, पी.एस.कराड, आर.बी.खैरे, आर.एफ.मदने, आय. पी.काळे, पी.आर.खुटेमाटे, जे.व्ही.दरेकर, सागर धनवे आदींनी सहभाग घेतला होता. या रेडमध्ये पोलिसांनी आरोपींकडून १ लाख १९ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम आणि पाच चारचाकी गाड्या असा एकूण ३३ लाख १९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी भुषण कांतीलाल भुरट (रा. लोणावळा), दिनेश कांतीलाल शाह (वय ६२), मोहोम्मद याकूब युसुफ मियाँ शेख (वय ४४), विनोदभाई उमरसीभाई नंदा (वय ५८), गवरान वासुदेव जोशी (वय २९), राजेंद्र पुरुषोत्तमभाई पटेल (वय ३९), रामणिकलाल मनसुरतभाई जीवनी (वय ६२), जितेंद्र ललीतभाई व्यास (वय ५०), विवेक रामजीभाई काछडिया (वय २६), राजेश बाबूभाई परसाळा (वय ४३), हितेंद्र सामंत चौहान (वय २९), सोहेल विष्णुभाई पटेल (वय २३), अशोक कारिदास पटेल (वय ४६), मनोज कन्नूभाई व्यास (वय ५४), निलेश जयंतीलाल शहा (वय ५२), विजय विठ्ठलभाई पटेल (वय २८), कल्पेश मनिलाल पटेल (वय ३६), दीपक विष्णू पटेल (वय ३१), सिराज कामरुद्दीन टाय (वय ३२), चिराग जगदीशभाई दवे (वय २७), सुरेशभाई अंबालाल पटेल (वय ४६), अमर गुणवंतभाई आचार्य (वय ३२), जितेंद्र गोबरभाई पटेल (वय ३४), विष्णुभाई हरिभाई पटेल (वय ५२), जयेश हिराभाई साकरिया (वय ३९), प्रफुल्लभाई रामभाई पटेल (वय ५२, सर्व रा. गुजरात), मोहन लालूनाथ जोगी, मोहननाथ मेघनाथ जोगी, रमेश धनाजी पटेल आणि विजयकुमार अमरजीत पाटीदार (सर्व रा.राजस्थान) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ चे कलम ४ व ५ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.