Lonavala : गिधाड तलाव धबधब्यात पडून पुण्यातील तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सुट्टीनिमित्त मित्राच्या समवेत भुशी धरण आणि गिधाड तलाव परिसरात वर्षाविहाराला आलेल्या पुण्यातील एका तरुणाचा आज गिधाड तलाव धबधब्यात पडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 2.30च्या सुमारास घडली.

श्रीराम दुर्ज साहू (वय 24, मूळ राहणार पांड्या पुरुषोत्तमपुर,ओडीसा, सध्या राहणार सणसवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र संजयकुमार साहू याने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात श्रीराम याच्या मृत्यूबाबत खबर दिली आहे.

  • लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीराम, संजयकुमार आणि त्याचे अन्य दोन मित्र असे चारजण आज सकाळी लोकलने लोणावळ्यात वर्षाविहाराला आले होते. भुशी धरणाजवळ एका हाॅटेलात त्यांनी मद्य सेवन करत जेवण केले.

दुपारी ते गिधाड तलाव परिसरात गेले असता तेथील धबधब्यात श्रीराम याने वरुन उडी मारली. धबधबा खोल असल्याने गंभीर मार लागून त्याचा पाण्यात मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.