Lonavala  : आरोग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नगरपरिषदेच्या रुग्णालयाबाहेर परप्रांतीयांच्या रांगा

एमपीसी न्यूज : गावाकडे जाण्यासाठी अवश्यक असणारे आरोग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या रुग्णालयाबाहेर दोन दिवसांपासून परप्रांतियांनी रांगा लावल्या आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यत ही मंडळी प्रमाणपत्र मिळविण्याकरिता मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. 

गेल्या दोन दिवसात जवळपास एक हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर  त्यांना गावी जाण्याकरिता आरोग्य प्रमाणपत्र देण्यात आले आहे. लोणावळा शहरासह ग्रामीण भागातील नागरिक देखील प्रमाणपत्र घेण्याकरिता रांगेत थांबत असल्याने गोंधळ निर्माण होत आहे.

लोणावळा शहरात काॅरंन्टाईन केलेल्या नागरिकांची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडे आहे. बाहेरील नागरिकांची माहिती उपलब्ध नसल्याने अर्ज भरताना अडचणी येत आहेत.

नगरपरिषदेच्या संक्रमण शिबिरात असलेले अमरावती व इतर ठिकाणच्या नागरिकांची आरोग्य तपासणी व प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्यांना गावाकडे रवाना केले जाणार आहे.

दरम्यान, लॉकडाउनच्या कालावधीत शहरात अडकून पडलेल्या नागरिकांना आता आपल्या मूळ गावी जाण्याची मूभा मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.